नवी मुंबई : मोबाईल फुटेजद्वारे पोलिसांना क्रूर ठरवणाऱ्या एका व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. पनवेल पोलिस दोन गुंडांना बेदम झोडपत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांच्या क्रूरतेवर टीका होऊ लागली.


काय होतं त्या व्हिडिओमध्ये तुम्हीच पाहा.



आता इतकी फटकेबाजी झाल्यानंतर पोलिसांवर टीका होणारच. सहाजिकच मीडियाने पोलिसांना याबाबत विचारलं. पण पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने मार खाणाऱ्या तरुणांना झालेली शिक्षा ही योग्यच असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या मोबाईल क्लिपच्या घटनेच्या आधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं आणि सगळा प्रकार समोर आला.



माणगावचे दिनेश नाईक कुटुंबासह पनवेलमध्ये आले होते. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन तरुणांनी आख्ख्या कुटुंबाला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर लोखंडी रॉड डोक्यात घातला. हीच कहाणी सांगणारा हा व्हिडीओ पोलिसांनी समोर आणला आहे. कुटुंबाला बेदम मारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अद्दल घडवली.

दरम्यान, या मारहाणीनंतर पोलिसांचं काय म्हटलं तेही पाहुयात...



संपूर्ण व्हिडीओ