मुंबई : मुंबईतल्या लोअर परेल भागातील सेंट रेगिस फिनिक्स हॉटेलमध्ये आग लागल्याचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर फिरणारा हा मेसेज खोटा असून, ती निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.


'ही खोटी बातमी आहे. बातमीसोबत फिरणारा फोटोही कुठून आला, तो खरा आहे का, असल्यास त्याचा तारीख वार काय, त्याच्या सत्यतेबाबत काहीच माहिती नाही' असं मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळेंनी 'डीएनए'ला सांगितलं आहे.

ट्विटरवर ही अफवा व्हायरल झाल्यानंतर अनेक स्थानिकांनीही या वृत्तात काहीच दम नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अनेकांनी ट्विटरवर लाईव्ह फोटो पोस्ट करुन सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केला.

https://twitter.com/PoojaSolanki/status/807109192565727232

https://twitter.com/GoldenMihir/status/807115868954095616