Mumbai News Update : मिरा रोड येथील एका रेस्टॉरन्ट समोरील रस्त्यावर दोन तरुणींमध्ये जोरदार मारामारी झालीय. कपडे फाटेपर्यंत झालेल्या या मारमारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. हा नवीन रेस्टॉरन्ट सुरु झाल्यापासून येथे तरुण तरुणींची मद्यधुंद अवस्थेत मारामारी नित्यनियमाची झाल्याचं आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितलं आहे. स्थानिक पोलिसांकडून या रेस्टॉरन्टवर कारवाई होत नसल्याचा ही आरोप होत आहे. तर या मारामारीबद्दल तर स्थानिक पोलिस यंत्रणाच अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे. शनिवारी रात्री ही घटना घडलीय.  


तीन तरुणी एकमेकींना शिवीगाळ करुन मारामारी करत असल्याचे वायरल झालेल्या व्हीडीओमध्ये दिसत आहेत. काही तरुण मध्यस्थीचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सर्व तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्या कोणाचेच ऐकत नासल्याचं व्हिडीओमध्ये दिसत.  


मिरा रोड येथील एका रेस्टॉरेन्टमध्ये म्युझिकवर तरुण तरुणी थिरकत असतात. बार अँण्ड रेस्टॉरन्ट असल्यामुळे येथे दारु देखील मिळते. रात्री दोन वाजेपर्यंत या हॉटेलला परवानगी आहे. त्यामुळे तरुण तरुणींच्या येथे रात्रभर पार्ट्या चालतात. यातूनच रेस्टॉरन्ट बाहेर रस्त्यावर अनेक वेळा मारामारीच्या घटना घडल्या आहेत. अनेक तरुण तरुणी सायंकाळी सहा नंतर येथे येतात. शिवीगाळ, दारु पिउन धिंगाणा घालतात. बाजूच्या सोसायटीतील रहिवाशी पोलिसांकडे तक्रार करायला घाबरतात. कुणी केली तरी पुलीस फक्त तातुरमाथूर कारवाई करतात, असा आरोप नागरिकांनी केलाय. 


संबंधित रेस्टॉरेन्टच्या कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ तेथीलच आल्याची पुष्टी केली आहे. ही घटना शनिवारची असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिलीय. रेस्टॉरन्टच्या बाहेर कुणी धांगड धिंगा करत असेल तर त्याला आम्ही जबाबदार कसे असा प्रश्न देखील रेस्टारेन्टकडून उपस्थित करण्यात आलाय. 
 
याबाबात एबीपी माझाने मीरा रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह बगल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनाच पाच दिवसापूर्वीची ही घटना माहित नव्हती. त्यांनी माझाच्या प्रतिनीधीकडून हा व्हिडीओ मागवून घेतला आणि पुढील चौकशी केली जाईल अशी माहिती दिलीय.   


महत्वाच्या बातम्या 


Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीच्या मुंबईतील मोर्चासाठी परवानगी, मात्र 'या' अटींचं पालन करावं लागणार