वसई : लसीकरणासाठी शासनाच्या अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. असं असलं तरी नोंदणी करताना स्लॉट मिळेलच याची शाश्वती नाही. हिच अडचण वसईतील दोन भावांनी दूर केलीय. त्यांनी ऑटोमॅटिक स्लॉट्स सिलेक्शनसाठी खास अॅपचं तयार केलं आहे.


वसईत राहणारे प्रथमेश घरत आणि अभिषेक घरत या दोन सख्ख्या भावांनी हे अ‍ॅप विकसीत केलंय. ऑटो वॅक सॅक म्हणजेच ऑटोमॅटिक व्हॅक्सीनेशन स्लॉट अव्हेलबिलीटी चेकर नावाचं हे अ‍ॅप आहे. यामध्ये आपण आपला पिन कोड टाकून ठेवल्यास आपल्या जवळच्या भागातील सर्व ओपन लसीकरणासाठीचे स्लॉट्स माहिती पडतील. इतकाच काय तर स्लॉट्स ओपन असल्यास आपल्याला या टूलमध्ये अलार्म सुद्धा वाजेल जेणेकरून स्लॉट्स बुक करता येईल. देशभरातील कुठेही ऑटोमॅटिक स्लॉट्स बुक या टूलने अगदी काही सेकंदामध्ये करता येईल. जेणेकरून तासनतास मॅन्युएली स्लॉट्स कुठे आहेत हे शोधण्याची गरज राहणार नाही.


प्रथमेश आणि अभिषेकने 2014 साली KraftPixel ही स्वतःची कंपनी काढली. या कंपनीच्या माध्यमातून दोघा भावांनी अनेक वेब डेव्हलेपमेंट केले आहेत. त्यातील एक म्हणजे राज्य निवडणुका आयोगासाठी मुंबई महानगरपालिकेवेळी महावोटर हे अ‍ॅप विकसित केलं. ज्या माध्यमातून पोल बूथ सर्च करण्यासाठी मतदारांना फार मदत झाली होती. आताही या कोरोना काळात आपला नंबर कुठल्या स्लॉटवर लागेल ही माहिती जाणून घेण्यासाठी, सर्वसामान्य नागरीकांना हा अ‍ॅप खुप मदत करेल हे नक्की.


देशभरात लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा ओलांडला
कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेने महत्त्वचा टप्पा गाठला आहे. देशभरात लसीकरणाचे आकडा 20 कोटीच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भारताने सुमारे 15.7 कोटी लोकांना 20 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी 11.3 कोटी लोकांना फक्त पहिला डोस मिळाला आहे, तर 4.35 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 20 कोटी डोसपैकी 20 टक्के लस आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. 18-44 वयोगटातील 6.4 टक्के आणि उर्वरित 73.6 टक्के डोस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यात आले आहेत.