वसई : मुसळधार पावसात वसई विरार शहरात तीन जणांचा पाण्यात बुडून, तर एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दोन आणि शुक्रवारी दोन घटना घडल्या आहेत.  या  घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, वसई विरार शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत. 


पहिली घटना :  वसई पश्चिमच्या गिरीज येथे राहणारा ब्रायन जोसेफ कार्व्हालो (44) हा 20 जुलै रोजी घरातून  बिस्किटे आणण्यास सांगून घरातून निघाला होता  तो परत आला नाही. त्यामुळे घरातील सदस्य त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता, तो घरासमोरील गटारात वाहून गेला होता.  जोरदार पावसाने घराबाहेर पडून अपघाती मृत्यू झाल्याची नोंद वसई पोलीस ठाण्यात केली आहे.   


दुसरी घटना - रामा शंकर (वय 26, रा. सिद्धार्थनगर, रा. यूपी) 20 जुलै रोजी दारूच्या नशेत रामा शंकर अर्नाळा शंकरपाडा येथे जमिनीवर  असलेल्या पाण्यात पडून त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.  अर्नाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 


तिसरी घटना -  21 जुलै रोजी वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मारंबळ पाडा जे.टी. विरार पश्चिम परिसरात घटनास्थळ गाठून मृत अविनाश पटेल या 45 वर्षीय मयत अविनाश पटेल याला पाण्यातून बाहेर काढले होते.  त्याला स्थानिक पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


चौथी घटना -  30 वर्षीय नरेश पटेल याचा विजेचा करंट लागल्याने मृत्यू झाला. वसई पूर्वेकडील ही घटना आहे. शुक्रवारी  सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. घराच्या  छतावर प्लॅस्टिक टाकताना  हाय व्होल्टेज वायरच्या कचाट्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.


राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस


राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे. तर चांगल्या पावसामुळं बळीराजा समाधानी झाला. या पावसामुळं आता शेती कामांना वेग येणार आहे. दरम्यान, राज्यात कोकणासह मुंबई उपनगर ठाणे परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पावसानं जोरदार बँटिंग केली आहे. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.