वसई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे काही अंतरावर एका अज्ञात व्यक्तीने मालगाडीच्या  सहाय्यक लोकोपायलटवर दगड मारल्याने लोकोपायलटला दगड लागून जखमी झाला आहे. त्याला वसईच्या (Vasai News) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.  


रविवार दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी गुजरातच्या बलसाड रेल्वे स्थानकापासून ते वसई रेल्वे स्टेशनपर्यंत  यूएनजीयू-केटीआयजी या ट्रेनमध्ये प्रवास करत होत्या.  सुप्रिया अरविंद परोहा यांच्या  लोकोपायलटसह सहाय्यक लोको पायलट शिंभू दयाल मिना यांच्यासोबत ड्युटीवर होते. गाडी वैतरणा रेल्वे स्थानकाहून 7.55  ला सुटल्यानंतर काही किमीनंतर ट्रॅकवर एक अनोळखी इसम हा पटरीच्यामध्ये उभे होता. गाडी जवळ येता असताना त्याने इंजिनवर जोरदार दगड फेकून मारली आणि पटरी पार करुन तेथून निघून गेला. हा दगड इंजिनच्या लूक आऊट ग्लासला लागून, सहाय्यक लोको पायलट शिंभू मिना याच्या गळ्याला लागला. तसेच ग्लासचे तूकडे त्याच्या चेहऱ्याला आणि ओठाला लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना ताबडतोब वसईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


आरोपीचा शोध सुरू


लोकोपायलट सुप्रिया परोहा यांच्या तक्रारीवरून वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भारतीय रेल्वे ॲक्ट् 1989 कलम 152 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.


मागील पाच वर्षात  रेल्वेचे 55 लाख रुपयांहून अधिक नुकसान 


वंदे भारत एक्स्प्रेस वेग पकडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी या गाडीवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बिहार, पश्‍चिम बंगालसह देशातील अनेक भागांत गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेचे लाखोंचे नुकसान झाले आहे.2019 पासून, वंदे भारत गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेचे 55 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.  दगडफेकीच्या घटनांमध्ये 151 जणांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी किंवा कोणत्याही प्रवाशाचे सामान चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची घटना घडलेली नाही. एवढच नाही वंदे भारत गाड्यांवर दगडफेकीच्या काही घटना समोर आल्या आहेत. 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 (जून पर्यंत) या वर्षांमध्ये भारतीय रेल्वेला 55.60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


हे ही वाचा :                      


Mumbai local: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, कसारासाठी K ऐवजी N आणि कर्जतसाठी K ऐवजी S का लिहितात?