Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवन (Aambedkar Bhawan) परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. शनिवारी (27 मे) रोजी दादरमध्ये (Dadar) वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यावेळी, अज्ञातांनी लोखंडी रॉड, तलवार आणि चॉपर घेऊन हा हल्ला करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर (Rekhatai Thakur) यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. कार्यकर्त्यांवर हल्ला म्हणजे आंबेडकर भवनावर (Aambedkar Bhawan) हल्ला आहे, असं आम्ही मानतो आणि याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असे रेखाताई ठाकूर (Rekhatai Thakur) यांनी म्हटलं आहे.
शनिवारी (27 मे) रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही 3 जून रोजी होणार आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक 6.30 ते 7 च्या दरम्यान वंचितचे मुंबई (Mumbai) युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपर घेवून जीवघेणा हल्ला केला, असं वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
जयदीश गायकवाड यांच्यावर संशयाची सुई - रेखाताई ठाकूर
मागे प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्यासंबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांच्याकडे संशयाची सुई असल्याचं रेखाताई ठाकूर यांनी म्हटलं आहे.
हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ - रेखाताई ठाकूर
कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनतेतर्फे निषेध व्यक्त करतो, असं रेखाताई ठाकूर (Rekhatai Thakur) यांनी म्हटलं आहे. आंबेडकर भवनावरील (Aambedkar Bhawan) हा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही आणि आम्ही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असंही वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर म्हटल्या आहेत. तर, जनतेत या हल्ल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया आहे, असंही पुढे त्या म्हणाल्या.
हेही वाचा: