पालघर : मनोर येथील वैतरणा खाडी पात्रात शार्क माशाने मंगळवारी विकी गोवारी या तरुण 32 वर्षीय तरूणावर हल्ला केला होता. विकी गोवारी या तरुणाला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याच्यावर सध्या सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, मादी जातीचा हा शार्क मासा मृत पावला होता. या शार्क माशाचा पोटात तब्बल 15 पिल्ले सापडली आहेत. बुल शार्क मासा आहोटीला आल्याने त्याला माघारी जाता आले नाही. पाण्याचा प्रवाह नसल्याने आहोटी आल्याने तिथेच तो अडकून राहिला. मासा भरकटल्याने भरतीच्या वेळी खाडीपात्रात पोहोचला असावा, असा अंदाज वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी यांनी वर्तवला आहे. तसेच संरक्षित प्रजातींच्या अनुसूची 1 मध्ये मोडत असल्याने या माशाच्या मृत्यूप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोर वन परिक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी पंचनामा करून हा मृत मासा ताब्यात घेतला. हा मासा डहाणू येथे नेण्यात आला.
मध्यरात्री एक वाजता उपवन संरक्षक कार्यालयातील वाईल्ड लाईफ रेस्क्यू पथकाच्या ताब्यात शार्कला देण्यात आले आहे. या शार्क माशाचे वजन 450 किलो व लांबी 2.95 मीटर असून जेसीबी मशीनच्या साहाय्याने मृत शार्क माशाला खाडी पात्रातून बाहेर काढण्यात आले. ही मादी जातीची बुल शार्क होती. त्याच्या गर्भाशयातून पिल्लू बाहेर येताना दिसणारी पिशवी दिसत होती.तसेच गर्भाशयातून लहान बेबी बुल शार्क बाहेर येताना दिसत असल्याने सखोल गर्भाश्यात हात टाकून तपासणी केली असता अनेक बेबी बुल शार्क असल्याचे हाताला जाणवले. गर्भाशयात एकूण 15 पिल्ले होती. पिल्लांचे वजन 5 किलो पेक्षा जास्त होते. त्यांना शवविच्छेदन करून दफन करण्यात आले.अहवाल तपासणी प्रयोग शाळेत पाठवला आहे .
माशाची शारीरिक रचना -
कुठल्याही प्राण्यामध्ये जेव्हा गर्भाची पूर्ण वाढ होते, तेव्हा त्याचे डोके गर्भ मुखाच्या बाजूने असते. परंतु या माशामध्ये त्याचे मागील शेपटीचे फिन हाताला जाणवले. प्रत्येक बेबी माशाला वेगळी नाळ आणि प्लेसनटा बॅग होती. त्यांना श्रवणेंद्रिय हे मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत होते.तर दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञानासाठी काही प्रमाणात व तोल सांभाळण्यासाठी मुख्यत: होतो.आफ्रिकेतील झांबेझी शार्क (अनौपचारिकरित्या झांबी ) आणि निकाराग्वामधील निकाराग्वा सरोवर शार्क म्हणून ओळखली जाणारी बुल शार्क ( कार्चरिनस ल्यूकास ) ही रेक्वीम शार्कची एक प्रजाती आहे.
या माशाचे वैशिष्ठ्य -
बुल शार्क युरीहॅलिन म्हणजेच मीठ आणि ताज्या पाण्यात दोन्हीत वाढू शकतात. ते नद्यांच्या वरच्या प्रवासासाठी ओळखले जातात आणि मिसिसिपी नदीपर्यंत अल्टोन, इलिनॉय , समुद्रापासून सुमारे 1,100 किलोमीटर (700 मैल) पर्यंत प्रवास करण्यासाठी ओळखले जातात. मोठ्या आकाराचे बुल शार्क बहुधा जवळच्या किनार्यावरील शार्क हल्ल्यांसाठी जबाबदार असतात.