मुंबई: उत्तर भारतातील केस कापण्याच्या घटनांचं लोण आता मुंबईतही पसरत आहे.
मुंबईतल्या भायखळामध्ये 2 तर वडाळ्यात 1 अशा एकाच दिवसात वेण्या कापण्याच्या 3 घटना घडल्या.
भायथळाच्या आग्रीपाडा परिसरात रौशन मन्सूरी या जेव्हा रात्री झोपायला गेल्या, तेव्हा त्यांच्या डोक्यात दुखू लागलं, त्या गोळी घेऊन परत झोपल्या. मात्र नंतर त्यांना त्यांच्या अंगावरून काहीतरी जातंय असं भासलं, त्यांनी लाईट लावली, तेव्हा त्यांना त्यांची वेणी कापल्याचं समजलं.
तर दुसरीकडे 40 वर्षांच्या महिलेचे केस कापल्याचं समोर आलं, मात्र नेमकं काय घडलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.
तिकडे वडाळ्यात अनिता शर्मा या केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्या झोपून उठल्यानंतर त्यांना लक्षाल आलं की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.