मुंबई: येत्या 20 ऑगस्ट रोजी मिरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुका होत आहेत. सर्वपक्षीय नेते महापालिका प्रचारात दंग आहेत. ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत.


काल संध्याकाळी मिरा भाईंदर येथील काँग्रेस प्रचाराची सभा संपवून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चक्क लोकलने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

'रस्त्यातील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी लोकल प्रवासाला पसंती दिल्याचं त्यांनी सांगितलं.