UTS app open for common people :  लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा आहे. मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर युटीएस अॅपवरून तिकिट बुकिंग बंद करण्यात आले होते. युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या लसीकरण प्रमाणपत्र पोर्टलशी जोडले गेले आहे. 


कोरोना काळात मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकल रेल्वे बंद ठेवण्यात आली होती. आपात्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. लसीकरणाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर लोकल प्रवासाची मागणी वाढू लागली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने 10 महिन्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू केला. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, युटीएस अॅपमधून तिकिट बुकिंग करण्याची मुभा देण्यात आली नव्हती. 


अखेर युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या युनिर्व्हसल पास पोर्टलशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे. 


लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र, त्यामुळे काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण होते. रेल्वे ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर सरकारने रेल्वेला पत्र लिहून लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारच्या पत्रात होती. 


18 वर्षा खालील मुलांना आणि काही वैद्यकीय कारणांमुळे लस घेऊ न शकलेल्या नागरिकांना 15 ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला होता. 18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


एसटी संपावर राज्य सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवार यांनी सांगितला 'हा' तोडगा!


Coronavirus : पालकांची चिंता वाढली! गेल्या 20 दिवसांत राज्यातील हजाराहून जास्त मुलांना कोरोनाची लागण


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha