Parambeer Singh Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या एका गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. परमबीर सिंह यांचे हे प्रकरण तपास अधिकारी बेजबाबदारपणे हाताळत असल्याचा आरोप तक्रार करताना आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या तपासासंदर्भातील कोणतीही माहिती दिली जात नाही. ज्याचा फायदा थेट आरोपींना होत असल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. तपास अधिकाऱ्यांच्या या वर्तवणुकीमागे नक्की काय कारण आहे. याचाही तपास होणं गरजेचं असल्याचे त्यांनी म्हटलं. 


ठाण्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर परमबीर सिंह यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त एन.टी. कदम, पोलीस निरीक्षक राजकुमार कोठमिरे, माजी एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप सिंह आणि गँगस्टर रवी पुजारी यांच्यासह 28 जणांविरोधात खंडणी घेतल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. 


प्रदीप घरत यांनी 'एबीपी नेटवर्क'शी बोलताना म्हटलं की, या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून 30 सप्टेंबर रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्याची माहिती सरकारच्या वतीनं तपास अधिकाऱ्यांसोबतच इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येते. 


या प्रकरणाचे तपास अधिकारी बाबासाहेब निकम यांनाही माहीत असल्याचे प्रदीप घरत यांनी म्हटले. तपास अधिकारी निकम यांच्याकडून त्यांना तपासाशी निगडीत कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप प्रदीप घरत यांनी केला. तपास अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे या प्रकरणाबाबत काहीच ठोस माहिती नसल्याचे घरत यांनी म्हटले. 


तपास अधिकारी निकम यांचं अशा प्रकारची वर्तवणूक ही त्यांच्या तपासाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करतात. आरोपींनाही याचा फायदा मिळत आहे. कोर्टात या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी अडचणी येऊ शकतात असेही घरत यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा, कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण


टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha