Pankaj Munde :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याला कशाचीही अपेक्षा नसल्याचे सांगितले.  मी लोकांमध्ये असून राज्यभर फिरत आहे.  कुठल्या पदाने काही होणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत टिप्पणी केली होती. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्याला कसलीही अपेक्षा नसल्याचे म्हटले. 


पंकजा मुंडे यांनी या आधीदेखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मला आता कशाचीही अपेक्षा नाही. मी लोकांमध्ये आहे. मी राज्यभर फिरत आहे. कुठल्या पदाने काही होणार नाही असेही पंकजा यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे स्थापन केलेल्या सरकारबाबत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्या शपथविधीबाबत दोन्ही नेत्यांनी भाष्य केले आहे. आता त्या शपथविधीला दोन वर्षे झालीत. पुढे आणखी काही वर्ष होतील असेही पंकजा यांनी म्हटले. 


बुलढाण्यात काय म्हटल्या होत्या पंकजा?


पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. दुसरबीड येथे शनिवारी माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी एखाद्या फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, लोकांच्या दहा परिक्रमा करेन. पण कुठल्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटले होते.
 


ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीका


"आयोगाला पुरेसा निधी देण्याची गरज असतानाही, सरकारनं 15 महिन्यांमध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या. त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. यापूर्वीही मी म्हटलं होतं की, या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचंय की, काय? ओबीसी आरक्षण संपुष्टात आणायचंय की, काय? असा प्रश्न राज्यातील ओबीसींमध्ये आहेत.", असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडे बलाढ्य मंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे. पण या शासनाकडे ओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी निधी नाही. या आयोगाला निधी पूर्वीच उपलब्ध करुन दिला असता, तर अशी वेळ आली नसती, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले. 


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha