त्यानुसार आज उर्वशी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. सकाळी 11 ला आलेली उर्वशी दुपारी 3 वाजता चौकशी पूर्ण करून बाहेर आली. या चौकशीला डीसीपी संग्राम निशानदार यांच्यासह एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते. चौकशीत पोलिसांनी उर्वशीच्या मोबाईल मधील डेटा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. तिने ज्या एलजीबीटी प्राईड परेडमध्ये शरजिलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या त्या आंदोलनाचा उद्देश्य काय होता? ते कुणी आयोजित केले होते? उर्वशीच्या घोषणाबाजीच्या मागे नेमका काय उद्देश्य होता? असे सगळे प्रश्न उर्वशीला विचारण्यात आले. मात्र तिने आपल्या आंदोलनाचे समर्थन केले पण घोषणाबाजी देश तोडायच्या उद्देशाने केली नसल्याचे म्हटले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
उर्वशी ही गेले 2 महिने मुंबईत होत असलेल्या सीएए, एनआरसी आणि एनपीए विरोधात आंदोलन करीत होती. ओक्युपाय गेट वे ऑफ इंडिया या आंदोलनात देखील ती सर्वात पुढे होती. एलजीबीटी प्राईड परेडच्या आंदोलनात सहभागी झालेल्या 50 लोकांवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. उर्वशी त्यापैकी एक आहे. तिची शुक्रवारी परीक्षा आहे, मात्र उद्या तिला पुन्हा पोलिसांसमोर हजर राहावे लागेल.
उर्वशी चुडावालाला हायकोर्टाकडून सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर
जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीने उर्वशी चुडावालाला सशर्त अटींवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला. तसेच अटक झाल्यास 20 हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तिनं चौकशीसाठी हजर रहावं, तसेच आपला पासपोर्ट आणि ड्युअल सिम मोबाईलही पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई आणि ठाण्याव्यतिरिक्त बाहेर जायचे असल्यास हायकोर्टाची परवानगी घेण्यात यावी. असे निर्देश देत अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
WEB EXCLUSIVE | स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिल्या गेलेल्या कोलूच्या शिक्षेचा अनुभव आणि इतिहास पाहा
संबंधित बातम्या :
भारताचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या शरजील इमामला अखेर बेड्या
मुंबई आयआयटीत राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, हॉस्टेलची नवी नियमावली