Ulhasnagar News Update : उल्हासनगर शहरात एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून काही जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडे अकरा वाजताची घटना असून काही रहिवासी किरकोळ जखमी झाले आहेत, या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीला खाली करून ढिगारा उचलण्याचं काम सुरू केलं आहे. .


उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 च्या भाटिया चौकात स्वामी नारायण पॅलेस ही इमारत आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब हा दुसऱ्या मजल्यावर कोसळला. त्या वेळेस घरात 3 ते 4 सदस्य बसले होते. देव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत तीन ते चार जण फक्त किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कुणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नाही. दरम्यान रात्रीच या घटनेची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.




या इमारतीत राहणारे 10 कुटुंबाना इमारत खाली करण्याचे आदेश दिले. राहिवाशांनी सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळेस इमारत खाली केली. पालिका प्रशासनाने इमारत खाली झाल्यानंतर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. ही इमारत 1996 साली बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये 10 प्लॅट असून काही दुकानं आहेत. इमारत धोकादायक यादीत नसतानाही अचानक स्लॅब कोसळला.


अचानक घडलेल्या या घटनेची सखोल तपास पालिका प्रशासन करणार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. लोकांना इमारती बाहेर काढण्यासाठी मदद केली. मात्र उल्हासनगर शहरात 20 ते 25 वर्षे जुन्या आशा अनेक इमारती असून त्या जर्जर झाल्या आहेत. त्यांचा प्रश्न आता या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


"हिम्मत असेल तर वांद्रे येथे येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहेत"; मातोश्रीसमोर जोरदार बॅनरबाजी


Rajasthan Temple News : राजस्थानमध्ये 300 वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर पाडले, भाजपचा काँग्रेसवर निशाणा