Uddhav Thackeray Attack on BJP : भगवं वादळ दिल्लीच्या तक्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार, असं म्हणत शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दत्ता घोर्डे जे पैठण शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. वैजापूरचे डॉ. राजेंद्र डोंगरे, संभाजीनगरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शोएब हाशमी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. मंगळवारी मातोश्रीवर या सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला, यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.


महाराष्ट्रचं देशाची दिशा ठरवणार


यावेळी ते म्हणाले की, गेले चार दिवस मी कोकण किनारपट्टी भागात कुटुंब संवादासाठी फिरत होतो. मागील चार दिवस मी कोकण किनारपट्टीवर दौऱ्याला होतो. कोरोना काळात राबवलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' यानुसार मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत होतो. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का, हे मी पाहतो आहे. महाराष्ट्र दौरा करून माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का हे मला जाणून घ्यायचा आहे. महाराष्ट्रचं देशाची दिशा ठरवणार, असल्याचंही उद्धव ठाकरे यांन म्हटलं आहे.


दिल्लीच्या तक्तावर भगवं वादळ आदळणार


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दोन चक्रीवादळ येऊन गेली. आता हे तिसरं चक्रीवादळ येत आहे, हे भगवं वादळ आहे, जे दिल्लीच्या तक्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार आहे. काहींच्या मानत अजूनही प्रश्न आहेत की, महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आहे, पर्याय कुठे आहे. याला पर्याय म्हणून हुकूमशाही उघडून फेकायची असते.'


'मन की बात' पेक्षा 'जन की बात' वेगळी


भगवं वादळ दिल्लीला आदळणार, हे भगवं वादळ हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे. हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसतो हुकूमशाही उकडून फेकून द्यायचे असतं. मातोश्री आणि त्यासोबतच दौऱ्यावर असताना अनेक भाजपचे लोक शिवसेनेसोबत येत आहेत. 'मन की बात' पेक्षा 'जन की बात' वेगळी आहे. जनतेची संकट वेगळीच आहेत. गेल्या 10 वर्षातील भाजपाचा भोंगळवाणा कारभार उघडा पडला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर घणाघात केला आहे.


'संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नाही'


अनेक ठिकाणी गावागावात योजनाच पोहोचलेल्या नाहीत. हा भोंगळ कारभार संपवण्याठी सर्वजण शिवसेनेसोबत येत आहे. महाराष्ट्र आता यापुढे देशाची दिशा ठरवणार आहे, हुकूमशाहीला गाडणार आहे. मराठवाडा संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नसतो. मी रायगड, सिंधुदुर्ग फिरलो. जसं मी कोकणात फिरलो, तसा मी मराठवाड्यात सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहे, संभाजीनगर जालना आणि विदर्भात मी दौरा करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.


एक-एक लोक शरण जात आहे, नितीश कुमार गेले आणखी काही जातील. जे लाचार आहेत, भेकड आहेत, त्यांनी जरुर जावं. पण, आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे कित्येक पटीने जास्त आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या : 


पुढचा मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिवसेनेचाच; सुषमा अंधारेंकडून भरसभेत 'गॅरंटी'