9 डिसेंबर रोजी विक्रोळी येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव हे सकाळी देवळात दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यात एक गोळी जाधव यांच्या खांद्याला लागली आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांना दोघांपैकी एका हल्लेखोराला एकडण्यात यश आलं आहे. अटकेत असलेला आरोपी सागर मिश्रा तपासात कोणतीच माहिती देत नव्हता. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राच्या साहाय्याने क्राईम ब्रान्चला हे शस्त्र कानपूर ओरडीनेन्स फॅक्टरी मध्ये तयार केलं असल्याचं समजलं.
पाहा व्हिडीओ : मुंबईतील विक्रोळीत शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार
खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली असून मध्येप्रदेशमधून कृष्णधर सिंह तर ठाण्यातून आनंद फडतरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. परदेशात असलेला डॉन प्रसाद पुजारीने आपली दहशत मुंबईत स्थापित करण्यासाठी मध्येप्रदेशमध्ये असलेला मित्र कृष्णधर सिंह आणि सागर मिश्रा या दोघांना चांद्रशेखर जाधव यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईत पाठविले होते. मुंबईतील प्रसाद पुजारीच्या एका साथीदाराने या दोघांच्या राहण्याची सोय केली आणि विना नंबर प्लेटची बाईक यांना पुरवली, बाईक घेऊन हे विक्रोळीत आले आणि चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार केला होता.
नागपूरच्या महापौरांवर गोळीबार
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री अज्ञातांनी गोळीबार केला होता. सुदैवाने या घटनेत संदीप जोशी थोडक्यात बचावले. मंगळवारी संदीप जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या निमित्ताने ते कुटुंबासह निवडक मित्रांसह आऊटर रिंग रोडवरील धाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना जोशी यांच्या कारवर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या.