मुंबई : ठाकुर्ली स्थानकाच्या गर्डरच्या कामासाठी आज मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेने घेतलेल्या या चार तासांच्या पॉवर ब्लॉकमध्ये प्रवाशांचे आतोनात हाल झाले. चार तासांचा ब्लॉक काही मिनिटे आधीच संपला असून मध्य रेल्वेवरील लोकल आणि एक्स्प्रेस वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे डोंबिवली स्थानकावरील गर्दी आता ओसरू लागली आहे.


काही वेळापूर्वी राजधानी एक्स्प्रेस कल्याणकडून डोंबिवलीकडे रवाना झाली आहे, तर गोरखपूर एक्स्प्रेस डोंबिवलीहून कल्याणकडे रवाना झाली आहे. त्यामुळे लोकलसह एक्सप्रेस वाहतूकही सुरळीत होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे.


मध्य रेल्वेने केलेल्या नियोजनानुसार दर 15 मिनिटांनी डोंबिवलीहून सीएसटीकडे लोकल सोडण्यात येणार होती. परंतु हे नियोजन फसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. दरम्यानच्या काळात मध्य रेल्वेने काही रिकाम्या लोकल सोडल्यामुळे प्रवाशांना थोडीफार मदत झाली.





या एक्सप्रेस रद्द झाल्या
सीएसएमटी-पुणे सिंहगड ( 11009- 11010 )
सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन ( 12123-12124)
सीएसएमटी-मनमाड पंचवटी ( 12109- 12110)
सीएसएमटी-मनमाड राज्यराणी ( 22101-22102)
दादर-जालना जनशताब्दी ( 12071-12072)
सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी ( 11029- 11030)
सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर ( 51153- 51154)