आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 11:17 PM (IST)
मुंबई: नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तात्काळ बदली होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काल नवी मुंबई महापालिकेत अविश्वास ठराव पास झाल्यानंतर आज मुंढेंनी थेट मंत्रालय गाठलं. नवी मुंबईत केलेल्या कारवाया आणि कामांबद्दल नगरविकास खात्याकडे अहवाल दिला आणि या अहवालाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयालाही दिली. दुसरीकडे मुंढेंना हटवण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंढेंना हटवण्याची मागणी करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.