नवी मुंबई : नवी मुंबईतील जलवाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला केंद्राच्या पर्यावरण विभागानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पार पडेल, सिबीडी बेलापूर येथे मरिना सेंटर उभारण्यात येणार आहे अशी माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळेल. सोबच सिडकोच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांचा खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात येईल. 

Continues below advertisement


लवकरच नवी मुंबईतून मांडवा, भाऊचा धक्का, एलिफंटा ही जलवाहतूक सुरु होईल. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल. 


Petrol Diesel Price : पेट्रोल- डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर 


30 बोटी राहतील अशी जेट्टी असेल, अॅम्फी थिएटर, योगा आणि वॉकिंग ट्रॅकही इथे असणार आहे. स्वस्तिक कंपनीला यासंदर्भातील निविदा मिळाली असून, लवकरात लवकर भूमिपुजनानंतर काम सुरु करून या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा मानस मंदा म्हात्रे यांनी बोलून दाखवला. 


प्रकल्पाची वैशिष्ठ्य 


- या प्रकल्पाअंतर्गत 30 प्रवासी बोटी उभ्या राहतील.


- मांडवा, भाऊचा धक्का, एलिफंटा या मार्गावर जलवाहतूक सुरु केली जाईल.


- या प्रकल्पाअंतर्गत य़ोगा, अॅम्फि थिएटर आणि वॉकिंग ट्रॅकचीही सुविधा नागरिकांना देण्यात येईल.


- प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांचा खर्च सिडकोमार्फत केला जाणार आहे.


- सव्वा सात एकरांच्या जागेवर या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. 


नवी मुंबई आणि सदर परिसरातून मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतू दिवसागणिक वाढत चालली आहे. मुंबईकडूनही त्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे, त्यामुळं अनेकदा या मार्गांवर वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. पण, येत्या पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प नागरिकाच्या सेवेत येऊन जलवाहतुकीस सुरुवात झाल्यास एका नव्या पर्यायासह नागरिकांची वाहतूक कोंडीची डोकेदुखी दूर होणार आहे.