नवी दिल्ली : दर दिवसाप्रमाणेच आजही सकाळच्या सुमारास सरकारी तेल कंपन्यांक़़डून इंधनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. इथं दिलासादायक बाब अशी, की देशातील तेल उत्पादन बाजारामध्ये तेलाच्या दरांत कोणतीही वाढ अथवा कपात करण्यात आलेली नाही त्यामुळे इंधन दरवाढीला एक दिवसाचा ब्रेक लागला आहे. यापुर्वी मंगळवारी पेट्रोल 23 तर डिझेल 44 पैश्यांनी महागले होते. 


देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर 
दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर 93.44 आणि डिझेल 84.32 रुपये इतके आहेत. तर, मुंबईत हे दर 99.71 रुपये पेट्रोल आणि 91.57 रुपये डिझेल इतक्यावर स्थिर आहेत. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी 93.49 आणि डिझेलसाठी प्रती लीटरमागे 87.19 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 95.06 रुपये आणि डिझेल 89.11 रुपयांना विकलं जात आहे. 


Lunar Eclipse 2021 : या वर्षीतील पहिलं चंद्रग्रहण आज, कुठे आणि कधी दिसणार? जाणून घ्या


मागील तीन दिवसांत दोनदा वाढले दर 
मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. तर, सोमवारी या किंमती स्थिर होत्या. रविवारी मात्र हे दर वाढले होते. त्यामुळं मागील तीन दिवसांत दोनदा इंधनाची दरवाढ झाली होती. 






दर दिवशी सकाळच्या सुमारास निर्धारित होतात इंधनाचे दर 
पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीदिनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे निर्धारित होतात. दर निर्धारित करण्यापूर्वी तेल उत्पादन आणि वितरक कंपन्या महत्त्वाच्या गोष्टीं अंदाजात घेत दर निश्चित करतात. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दर दिवशी देशातील सर्व शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.