मुंबई  : मुंबईच्या नरसी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने 'TP100' म्हणजेच 'टोटल प्रोटेक्शन मास्क'ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला 'बॅटरी ऑपरेटेड मास्क' असून या मास्कमध्ये बॅटरीसोबत कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाचा असेल किंवा अन्य कोणताही विषाणू , बॅक्टरीया या मास्कच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणात नष्ट होतो. त्यामुळे  मास्कच्या वापरामुळे पूर्णपणे आपण सुरक्षित राहणार असल्याचे, नसरी मुनजी स्कुल ऑफ सायन्सच्या ज्या प्राध्यापकांनी याची निर्मिती केली आहे त्यांनी हा दावा केला आहे.


मागील 8 महिन्यापासून अशाप्रकारच्या मास्कच्या संशोधनावर नरसी मोनजी स्कुल ऑफ सायन्सचे डिन डॉ. नितीन देसाई आणि प्राध्यापक डॉ वृषाली जोशी हे काम करत होते. सर्व संशोधन झाल्यानंतर हा मास्क पूर्णपणे वापरासाठी तयार झाला असून आता लवकरच हा मास्क बाजारात येणार आहे. या मास्कच्या  संशोधनाचे दोन पेटंट सुद्धा मिळाले असून 40 विविध डिझाइनमध्ये हे मास्क तयार करण्यात आले आहेत. या टोटल प्रोटेक्शन मास्कची निर्मिती स्वतः नरसी मुनजी विद्यापीठ करणार असून मिल्टन फार्मा कंपनी हे मास्क बाजारात आणणार आहे. 


हे 'टोटल प्रोटेक्शन मास्क' कसा कार्य करतो ? 


'या मास्कच्या वापराने तुम्ही वायरस, बॅक्टरी यापासून पूर्णपणे सुरक्षित राहणार. सध्या वापरत असलेल्या साध्या मास्कमुळे ज्यामध्ये कपड्याचे असतील किंवा N-95 मास्क असतील त्याने एअर क्वालिटी फिल्टर होते. पण यामध्ये विषाणू, बॅक्टरीयाला चार्ज असल्यामुळे ते नेगटीव्ह पोसिटीव्ह कडे आकर्षित होतात. त्यामुळे या मास्क मध्ये कॉपर फिल्टर वापरले आहे व त्याला बॅटरी ऑपरेटरने चार्ज दिला आहे. साधारणपणे 3 वोल्ट पर्यंतचा सप्लाय कॉपर फिल्टरला दिला जातो. चार्ज कॉपर फिल्टरमुळे विषाणू, बॅक्टरीया, फंगस जे या पृष्ठभागावर येतात ते न्यूट्रल होतात, नष्ट होतील. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल.', अस या मास्कची निर्मिती करणारे प्राध्यापक, डॉ नितीन देसाई यांनी सांगितलं.


शिवाय, या मास्कची बाहेरील बाजू वॉशेबल असून  सहा महिन्यांपर्यत याची बॅटरी टिकू शकते. त्यामुळे साधारणपणे एक मास्क 6 महिने सहज वापरू शकत असल्याने साधारणपणे रोज वापरत असलेले 300 मास्क आपण वापरणे टाळू शकतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या मास्कची निर्मिती महत्त्वाची ठरते. शिवाय, या बॅटरीचा इफेक्ट 3 वोल्ट हा अगदी कमी असल्याने त्याचा कोणताही परिणाम मास्क घातल्यानंतर नाकावरती, मोबाइल वापरताना किंवा यावर पाणी पडल्यावर सुद्धा होणार नाही, असं प्राध्यापकांचा म्हणणं आहे. लॅब मध्ये याच पूर्ण टेस्टिंग झालेली आहे, 72 तास वापरून सुद्धा या मास्कमध्ये 0 %बॅक्टरीयल ग्रोथ मिळाली आहे. या मास्क बाबत कोरोनावर मागील तीन महिन्यापासून टेस्टिंग हापकीनमध्ये सुरू होते, त्याचे सुद्धा पोजिटीव्ह रिझल्ट मिळाले आहेत. या मास्कची किंमत बाजारात 800 ते 1200 रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे भविष्यात बाजारात जेव्हा हे मास्क येईल तेव्हा अनेकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी हा मास्क मदतगार ठरेल,असा विश्वास या प्राध्यापकांना आहे