मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरु केला आहे. या प्रकरणात जवळपास सव्वा लाख मुंबईकरांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. हे प्रकरण जवळपास 1000 कोटींचं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टोरेसच्या दादर कार्यालयात कोट्यवधींची रोख रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर ईओडब्ल्यूचं पथक दादरमध्ये दाखल झालं आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दादरच्या कार्यालयाचा पंचनामा केला जात आहे.
टोरेसची तीन बँक खाती बंद
आतापर्यंत ईओडब्ल्यूनं टोरेसच्या दादरच्या कार्यालयाची तीन खाती जप्त केली आहेत. या खात्यात जवळपास 11 कोटी रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे. टोरेस प्रकरणी EOW चं पथक दादरच्या कार्यालयात पंचनामा करण्यासाठी दाखल झालं आहे.
दादरच्या टोरेस कार्यालयातील लाॅकरमध्ये ५ ते ६ कोटी रोख अजूनही असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दादर च्या टोरेस कंपनीचा पंचनामा करण्यासाठी EOW (आर्थिक गुन्हे) शाखेचे पोलीस दादर कार्यालयात दाखल झाले आहेत. टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांकडून दादरच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांकडून गर्दी केली जात आहे. त्यामुळं दादरच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एकीकडे ईओडब्ल्यूनं दादरच्या टोरेस येथी कार्यालयाची तीन बँक खाती जप्त केली आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार जवळपास 1500 लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या संख्येमध्ये वाढ देखील होऊ शकते. दादरच्या भाजी विक्रेत्यांनी टोरेसमध्ये पैसे गुंतवले होते. त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत. फरार असलेल्या दोन आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलं, असल्याची देखील माहिती आहे.
तिघांना अटक दोघे फरार
टोरेस ज्वेलरी घोटाळा प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. तौसिफ रियाज आणि अभिषेक गुप्ता फरार आहेत. तर, दुसरीकडे सर्वेश सुर्वेसह तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमारी यांना अटक करण्यात आली आहे. प्लॅटिनम हर्नचा संस्थापक देश सोडून पळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. नवी मुंबई- मुंबईतील साधारणपणे सव्वा लाख गुंतवणूकदारांनी अधिक परताव्याच्या आमिषापोटी मोठ्या प्रमाणात टोरेसमध्ये पैसा गुंतवल्याचं समोर आलं आहे. काही जणांनी अधिक परतावा मिळतोय म्हटल्यावर कर्ज काढून देखील पैसे गुंतवले. मात्र, टोरेस कंपनी बंद झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला आहे.
इतर बातम्या :