कोल्हापूर : राज्यात गेल्या काही दिवसांत शिक्षक आणि शिक्षण (Education) क्षेत्रातील हत्या व आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी (Police) संबंधित विहिरीजवळ जाऊन मृतदेह बाहेर काढला. यावेळी, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मारुती व्हरकट असं या मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याने शहरात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला. विशेष म्हणे कागल नगरपालिकेच्या शाळेत हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे, व्हरकट यांच्या आत्महत्येमागेचं नेमकं कारण काय? असा प्रश्न कुटुबीयांसह नातेवाईकांना देखील पडला आहे. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मृतदेह रुग्णालयाबाहेर पावसात भिजत ठेवला
दरम्यान, दुसरीकडे भर पावसात एका मृतदेहाची हेळसांड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नेटीझन्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. एक तासाहून अधिक वेळ हा मृतदेह पावसात ठेऊन कर्मचारी गायब झाले होते. विशेष म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडला प्रकार घडल्याने राज्यातील सरकारी रुग्णालयात काय परिस्थिती असेल, राज्याच्या आरोग्य विभागाचे काय होत असेल? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
हेही वाचा
धक्कादायक! पुण्यातील भोंदूबाबाच्या आश्रमात वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे; 2 आयपॅडही जप्त