Mumbai Latest News : मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्याच्या शेजारी (CM House Varsha bunglaw) असलेल्या तोरणा बंगल्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. वर्षा बंगल्यात जाताना तोरणा बंगल्यातून आत जावं लागतं, वर्षा आणि तोरणा हा शेजारीशेजारी बंगला आहे. तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तोरणा बंगल्यात अपुऱ्या सुविधा आणि ड्युटीवरील पोलिसांना पडझड झालेल्या खोलीत राहण्याची वेळ आली होती. याबाबत तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदेंकडे (Shrikant Shinde) तक्रार केली होती.
तोरणा बंगल्यातील गैरसोयीच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीनं आदेश दिले आहेत. तोरणा बंगल्यात पोलिसांची राहण्याची चांगली व्यवस्था करा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंकडे तक्रार केली होती.
तोरणा बंगल्यात मागील अडीच वर्षांपासून राहण्याची नीट नसल्यानं मरणयातना सोसत असल्याची तक्रार इथं ड्यूटीला असलेल्या पोलिसांनी केली होती. वर्षा बंगल्यात जाताना तोरणा बंगल्यातून आत जावं लागतं. वर्षा आणि तोरणा हा शेजारीशेजारी बंगला आहे.
तोरणा बंगल्यात एका खोलीत अनेक पोलीस कर्मचारी राहत होते. पडझड झालेल्या खोलीत राहण्याची व्यवस्था असल्यानं पोलीस नाराज होते. खासदार श्रीकांत शिंदेंनी तातडीनं तोरणा बंगल्याची पाहणी केली आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
तातडीनं तोरणा बंगल्या पोलिसांना राहण्याची व्यवस्था करा असे आदेश खासदार श्रीकांत शिंदेंनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दखल घेत आजपासून पोलिसांना राहण्याची सोय करणार असल्याचं सांगितलं आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस वसाहतीत भेट देऊन पोलीसांच्या घरांबाबत बैठक घेतली होती.
ड्युटीवरील पोलिसांना पडझड झालेल्या खोलीत राहण्याची वेळ आली होती. तोरणा बंगल्यातील गैरसोयींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती. आता तोरणा बंगल्यात पोलिसांची योग्य व्यवस्था करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळं आतातरी पोलिसांची राहण्याची चांगली व्यवस्था होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दखल घेतल्यानं पोलिस बांधव देखील आनंदी आहेत.