News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

राज्यात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत, मुंबईतही उच्चांक

मुंबईत 29 मे रोजी पेट्रोल दर 86.24 रुपये होता, तो विक्रम काल मोडला. आज पेट्रोलदराने त्यापुढे मजल मारली.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल दराने मुंबईत विक्रमी दर नोंदवला आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल 86.25 रुपये मोजावे लागले होते, आज पेट्रोलने त्यापुढे मजल मारत 86.56 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे. यापूर्वी मुंबईत 29 मे रोजी पेट्रोल दर 86.24 रुपये होता, तो विक्रम काल मोडला. आज पेट्रोलदराने त्यापुढे मजल मारली. मुंबईचा कालचा पेट्रोल दर हा मेट्रो सिटीमधीलही सर्वात जास्त दर होता. दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली. डिझेलला रविवारी प्रतिलिटर 75.12 रुपये मोजावे लागले. महाराष्ट्रात अमरावतीत महाग पेट्रोल महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 87.81 रुपये प्रति लिटर इतका आहे. त्यानंतर औरंगाबदचा नंबर लागतो. औरंगाबादेत पेट्रोल 87.61 रुपये प्रति लिटर दर आहे. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर मुंबई – 86.56 पुणे 86.36 ठाणे – 86.64 नाशिक 86.94 औरंगाबाद – 87.61 नागपूर – 87.04 कोल्हापूर 86.74 अमरावती – 87.81   सिंधुदुर्ग – 87.48 अहमदनगर – 86.41 आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले. संबंधित बातम्या  स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच   डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं 
Published at : 03 Sep 2018 08:39 AM (IST) Tags: diesel price petrol rate in maharashtra petrol price

आणखी महत्वाच्या बातम्या

Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

Varsha Gaikwad : महाराष्ट्रातील मतदारच सत्तांतर करतील, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं; वर्षा गायकवाडांचे आवाहन

Varsha Gaikwad : महाराष्ट्रातील मतदारच सत्तांतर करतील, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं; वर्षा गायकवाडांचे आवाहन

PM Modi with Team India: मोदींनी रोहितला विचारलं, मातीची चव कशी होती, सूर्याला म्हणाले, जादूई झेल घेतलास, 7 सेकंदात काय काय झालं?

PM Modi with Team India: मोदींनी रोहितला विचारलं, मातीची चव कशी होती, सूर्याला म्हणाले, जादूई झेल घेतलास, 7 सेकंदात काय काय झालं?

प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती

प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती

टॉप न्यूज़

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!