मुंबई : आजचा दिवस हा बीडीडीवासीयांसाठी भावनिक आणि आनंदाचा दिवस आहे. कारण आजपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यास सुरूवात झाली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे नायगावं येथे उपस्थित होते. इंग्रजांचे कारागृह ते गिरणी कामगारांचं नंदनवन असा प्रवास या चाळींनी अनुभवला आहे. या सर्व इमारतींना जवळपास 100 वर्ष झाली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या घरांशी येथील नागरिकांचे नातेसंबंध होते. 


सध्या नायगावात या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 1995 च्या युती सरकारच्या काळापासून या चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या कामाला सुरुवात होत आहे. पाडण्यात येमाऱ्या या दोन्ही इमारतींना 100 वर्षाची परंपरा होती. या इमारती पाडण्याच्या वेली मोठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी अनेक येथील रहिवाशांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. कारण कित्येक वर्षापासूनचे त्यांचे ऋणाणुबंध जुळले होते.


आता येथील रहिवशांना 500 चौरस फुटाची नवीन घरे मिळणार आहेत. नागरिकांच्या अनेक पिढ्या या इमारतींमध्ये गेल्या आहेत. अनेक दिवसांपासून ते छोट्या घरांमध्ये राहत होते. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेऊन अखेर कामाला सुरूवात केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास साधारणत 7 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. 7 वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. 7 वर्षात पूर्णपणे कायापालट केला जाणार आहे. या ठिकाणी सफाई कर्मचारी, गिरणी कामगार राहत होते. 


ही उज्वल भविष्याची नांदी असून, यशाचा एक टप्पा पूर्ण केल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. कारण आता 107 चौरस फुटाच्या घरांमधून ते नागरिक 500 फुटांच्या घरांमध्ये राहायला जाणार आहेत. सध्या महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. महाराष्ट्रातील गरीब नागरिकांच्या पाठीशी आमच सरकार उभे असल्याचे यावेळी आव्हाड म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: