मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर जाणं सात युवकांना चांगलंच महागात पडलं आहे. समुद्रकिनारी भरधाव वेगात बोलेरो घेऊन जात असताना किनाऱ्यावर मोठी लाट आली अन् झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. सात मित्र बोलेरो कार घेऊन अक्सा बीचवर गेले होते त्यावेळी ही घटना घडली. घाटकोपर पश्चिममध्ये राहणारे सात जण वाढदिवस साजरा करण्यासाठी मालाड अक्सा समुद्रकिनारी पोहोचले. या 7 तरुणांनी नियमांकडं दुर्लक्ष केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले. कार समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेल्यानंतर लाटांच्या तडाख्यात आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत.
राहुल यादव असं मृत तरुणाचं नाव आहे. राहुल आणि त्याचे मित्र अक्षय नावाच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त बीचवर गेले होते. मालाडच्या अक्सा बीचवर वाढदिवसाची पार्टी आणि मौजमजा करण्यासाठी गेले. मात्र सर्व मित्रांनी बोलेरो पार्किंगमध्ये उभी करण्याऐवजी बीचवर घेऊन गेले. समुद्रकिनारी भरधाव वेगात बोलेरो चालवत असताना वेग जास्त असल्याने आणि त्याचवेळी किनाऱ्यावर मोठी लाट आली. यात बोलेरोच्या बोनेटवर आदळल्यानं राहुल यादव गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या घटनेत इतर 6 मित्रही गंभीर जखमी झाले आहेत. तिथं उपस्थित असलेल्या लाइफगार्ड सुरक्षा रक्षकांनी कारची काच फोडली आणि उर्वरित 6 जणांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप
- क्रुझ पार्टीतील 'त्या' तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
- नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha