आजच्या निर्णयात व्यवसायिक अभ्यासक्रम अंतिम वर्ष अंतिम सत्र परीक्षेत आतापर्यत उत्तीर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठांना लिहून आपल्याला परीक्षा द्यायची की नाही याबाबत लिहून द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.
सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका
विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय
व्यवसायिक अभयसक्रमच्या बाबतीत त्यात अभियांत्रिकी, हॉटेल मेंनेजमनेट, आर्किटेकचर, मॅनेजमेंट अभ्यासक्रम यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीत त्या अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांना आम्ही पत्र लिहून या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. तरी सुद्धा आमच्या काल झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत आम्ही या देखील परीक्षा रद्द करून ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय व्यवसायिक अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांसमोर ठेवला असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत दोन दिवसात निर्णय
एटिकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासाठी राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन यावर नेमकं काय निर्णय घ्यायचा हे ठरवलं जाऊन त्याबाबत विद्यार्थ्यांना कळवलं जाणार आहे.
CM Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, शिवसेना पक्षप्रमुख लाचार होणार नाही - ठाकरे