Thane Crime : ठाणे मनपा अधिकारी कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतरही ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी अजून काही थांबलेली नाही. अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करणाऱ्या ठाणे महापालिका पथकावर एका फेरिवाल्यानं चाकू उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ठाणे महापालिकेच्या पथकावर एका नारळ विक्रेत्यानं चाकू उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या फेरीवाल्यावर कारवाई करताना त्यानं त्याच्याकडे असलेला कोयता उगारला. आणि 'गेल्या वेळी फक्त बोट कापली होती, आता शीर कापू', असं म्हणत या फेरीवाल्यानं मनपा पथकावला धमकावलं. 2 दिवसांपूर्वीची घटना असून याची कुठेही नोंद झालेली नाही. तर, ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारीही या धक्कादायक घटनेबाबत अनभिज्ञ आहेत. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे, ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या मागच्याच बाजूला ही घटना घडली.
काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्यानं त्यांच्यावर अचानक चाकूनं हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांची 2 बोटं आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटलं. त्यानंतर त्यांना तातडीनं वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या फेरीवाल्यानं त्यांच्या डोक्यावर चाकुनं मारण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानं स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरु होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली होती.
दरम्यान, कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त केला जात होता. त्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी अजून काही थांबलेली नाही, हे नुकत्याच घडलेल्या घटनेवरुन दिसून येत आहे.
ठाणे मनपा अधिकारी कल्पिता पिंपळेंवर फेरीवाल्याचा हल्ला
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.