ठाणे : बुधवारी ठाण्यात कोरोना रुग्णांच्या आकड्याने गेल्या काही दिवसातील सर्व रेकॉर्ड्स मोडले. बुधवारी एकाच दिवसात तब्बल 455 रुग्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले. यामुळे ठाणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महत्प्रयासाने जुलै महिन्यात 400 च्या पुढे गेलेला रुग्णांचा आकडा दीडशे पेक्षा कमी करण्यात पालिकेला यश आले होते. मात्र आता पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या सणांसाठी दिलेली मोकळीक आता वाढत्या रुग्ण संख्येचे कारण बनते आहे.


बुधवारी महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकाच दिवसांत 455 रुग्ण आढळून आले आहेत. सर्व प्रभाग समित्यांमध्ये सध्या रुग्ण वाढलेले आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या काळात 125 पर्यंत पोचलेली रुग्ण संख्या आता पुन्हा 400 च्या घरात पोचली आहे. आजच्या या एकदिवसीय रुग्णसंख्येमुळे शहरातील एकूण अॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा 3 हजारांच्या घरात पोचले आहेत. सध्या 2967 इतके ऍक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहेत. तर बुधवारी 6या रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 874 झाला आहे. दुसरीकडे आतापर्यंत 24 हजार 840 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. याचे एकूण प्रमाण पाहिले तर 86.6 टक्के इतके आहे. जे मागच्या महिन्या पेक्षा कमी आहे. गेल्या महिन्यात 90 टक्के इतका रिकव्हरी रेट ठाणे शहाराचा होता. त्यामुळे रुग्ण संख्या वाढताना, रिकव्हरी रेट कमी होताना दिसत आहे.


ऑगस्ट महिन्यात उत्सवांसाठी दिलेली मोकळीक आणि परराज्यातून येणारे प्रवासी यांमुळे रुग्ण संख्या वाढली असल्याचे कारण सांगितले जात आहे. तसेच दरदिवशी 5 हजार कोरोना टेस्ट आता केली जात असल्याने देखील रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. असे असले तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाची आत्महत्या, हॉस्पिटल प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप


ठाण्यात एका दिवसात 5 हजारांहून अधिक चाचण्या; वाढलेल्या चाचण्यांमुळे रुग्ण संख्येत वाढ, पालिका आयुक्तांचा दावा


मुंबईत 'या' तारखेपासून सुरु होऊ शकतात संपूर्ण कार्यालयं, लोकल, शाळा- TIFR चं शास्त्रीय मॉडेल


ठाण्यातले ट्री मॅन विजय कुमार कुट्टी! घरात तब्बल 275 रोपट्यांची जोपासना