ठाणे : परराज्यातून महाराष्ट्रात येत असताना आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट करणे बंधनकारक आहे. ही टेस्ट केली नसेल तर महाराष्ट्रात येऊन टेस्ट करून मगच पुढे सोडण्यात येते. ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यासाठी प्रत्येक स्टेशनवर महापालिकांतर्फे टेस्टिंग करण्याचे केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र ठाणे स्थानकात या नियमाला बगल देऊन इतर राज्यातील प्रवाशांना थेट घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महानगरात कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.


या गोष्टीला रिक्षा चालक आणि पालिका कर्मचारी दोन्ही जबाबदार असल्याचे एबीपी माझाने केलेल्या पडताळणी दिसून आले आहे. रिक्षा चालक मोठे भाडे मिळवण्याच्या प्रयत्नात ठाण्याच्या सॅटिस ब्रिजवर जाऊन थेट प्रवाशांना छुप्या वाटेने रिक्षा स्टँडपर्यंत आणत आहेत. तर याच सॅटिस ब्रिजवर पालिकेने टेंस्टिंगसाठी केंद्र उभारले आहे. ज्यात मोजक्या गाड्यांच्या प्रवाशांचीच टेंस्टिंग केली जाते, इतर प्रवाशांना मात्र तसेच घरी सोडले जाते. आमच्यासमोर बिहार राज्यातून आलेल्या एका गाडीतील प्रवाशांना पालिका कर्मचाऱ्यांनी साधे विचारले देखील नाही. या दोन्ही गोष्टी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. पालिका कर्मचारी आणि रिक्षा चालक यांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता आहे.


हास्यास्पद गोष्ट म्हणजे ज्यावेळी रिक्षा चालकांना त्यांच्या चलाखी बद्दल विचारले त्यावेळी त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांवर निशाण साधला. तर पालिका कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकांना व्हिलन बनवले. मात्र या दोघांमुळे आटोक्यात आलेली कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकाराशी पालिका आणि रेल्वे प्रशासन अनभिज्ञ असून यावर काही ना काही कारवाई करण्याची गरज आहे. 


ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरु, काय बंद?


ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील कोरोना पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.


महत्त्वाच्या उतर बातम्या :