ठाणे : राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असतानाच आता म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार जोर धरू लागला आहे. राज्यातील विविध ठिकाणी म्युकरमायकोसिसचे अनेक सापडत आहेत. यावर उपाययोजना म्हणून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी सुसज्य ऑपरेशन थिएटर उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली होती. परंतु ही सुविधा उपलब्ध होण्याआधीच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 10 डॉक्टर व मेडिकल टीमने म्युकरमायकोसिस आजारावर गेल्या सहा महिन्यापासून आतापर्यंत 5 रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. 


कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळत असतानाच म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार डोकं वर काढू लागला आहे. तसं पाहिलं तर हा बुरशीजन्य आजार कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्यातच ज्या रुग्णांना हाय डायबिटीस, कॅन्सरसारखे सहा आजार असलेल्या रुग्णांना फक्त म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. यासाठी येत्या सात ते दहा दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि 15 बेडचा वॉर्ड तयार होणार असल्याच शिवाजी रुग्णालयाचे डीन भीमराव जाधव यांनी सांगितले.


पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे लवकरच सूसज्ज व्यवस्था उपपब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु त्या आधी पासूनच रुग्णालयात पाच स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम आणि पाच मेडिकल टीम काम करत आहेत. यामध्ये कोरोनाचा पहिल्या लाटेतील 2 तर दुसऱ्याला 3 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. प्रामुख्याने पाहिलं हा आजार सायनस म्हणजे नाकाद्वारे तसेच डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार घेतला नाही तर अंधत्व देखील येऊ शकते किंवा डोळे काढण्याची सुद्धा वेळ येऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


इतर संबंधित बातम्या


Mucormycosis |‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती


Mucormycosis : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसमुळे 52 मृत्यू, उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी धावाधाव