Mucormycosis : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसमुळे 52 मृत्यू, उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी धावाधाव
सध्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेपुढे कोरोनापाठोपाठ आव्हान उभे करणाऱ्या 'म्युकरमायकोसिस' या आजाराने कल्याण डोंबिवलीतही डोकं वर काढण्यास सुरुवात केलीय .तीन दिवसात सहा हुन ही रुग्णसंख्या आता 15 वर जाऊन पोहचली असून या सर्व रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .तर आणखी एका मृत्यूची नोंद झाल्याने म्युकरमायकोसिस मुळे मृतांची संख्या आता 3 वर पोचली आहे.दरम्यान या आजाराशी लढण्यासाठी केडीएमसी सतर्क झाली असून खाजगी रुग्णलयानी रुग्ण आढळल्यास तात्काळ महापालिकेला कळवावे अस आवाहन केडीएमसी कडून करण्यात आलंय.