Mumbai Corona Cases : आज मुंबईत 1425 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे तर 1460 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज 59 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत 6,93,644 एकूण रुग्ण समोर आले असून त्यापैकी 6,47,623 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबईत 14,468 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 29,525 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
पुणे शहरात आज नव्याने 931 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 931 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 63 हजार 103 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 076 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 40 हजार 173 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 12 हजार 226 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 4 हजार 324 इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 44 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 887 इतकी झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 47371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 5026308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43% एवढे झाले आहे.
राज्यात आज 738 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32154275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5497448 (17.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2935409 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3832253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.