मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा यूनियन्सनी भाडेवाढ करण्याची मागणी केलेली आहे. वाढलेला खर्च आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला त्यांनी दिला आहे. सध्या एका किलोमीटरसाठी टॅक्सीचं भाडं 28 रुपये तर रिक्षाचं भाडं 23 रुपये इतकं आहे. यूनियनच्या नेत्यांच्या मते हे दर फार काळ राहणं योग्य नाही.
मुंबईतील टॅक्सी यूनियनचे नेते ए.एल. क्वाद्रोस यांनी आम्ही यापूर्वीच संबंधित यंत्रणांना टॅक्सीच्या भाड्यामध्ये 4 रुपयांची वाढ करण्याबाबत विनंती केल्याचं म्हटलं. ही मागणी मान्य झाल्यास एका किलोमीटरसाठी किमान 32 रुपये मोजावे लागतील. ऑटो रिक्षा यूनियनचे थम्पी कुरिअन यांनी उपनगरातील ऑटो रिक्षाचा 1 किलोमीटर अंतराच्यासाठी किमान रक्कम 23 रुपयांवरुन 26 रुपयांवर न्यावी, अशी विनंती केल्याचं म्हटलं आहे. आमची मागणी खटुआ समितीच्या शिफारशींवर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचं अध्यक्षपद वाहतूक सचिवांकडे असतं त्यांनी मंजुरी दिल्यानंतर दरवाढीच्या प्रस्तावाबाबत निर्णय होऊ शकेल, माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एमएमआरटीएकडून विविध गोष्टींची पडताळणी केली जाते. त्यामध्ये कस्टमर प्राईस इंडेक्स, व्हेईकल कॅपिटल कॉस्ट्स, मेन्टेनन्स आणि रिपेअरींग खर्च, विमा आणि कर याबाबतचा विचार करुन दरवाढीबाबत निर्णय होईल.
जर रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची मागणी मान्य झाल्यास रिक्षाचं बेस फेअर 3 रुपयांनी वाढून ते 26 रुपये होईल. तर,टॅक्सीचं मूळ भाडं 28 रुपयांवरुन 32 रुपयांवर जाईल. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये भाडेवाढीसंदर्भात निर्णय झाला होता.
एसटीचा देखील भाडेवाढीचा प्रस्ताव
एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर,दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
एकीकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या यूनियनकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तो मान्य झाल्यास मुंबईकरांना प्रवासासाठी अधिकचा खर्च करावा लागू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं साधारणपणे 14 ते 18 टक्क्यांपर्यंत भाडेवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. तो मान्य झाल्यास एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकची रक्कम मोजावी लागू शकते.
ऑटोरिक्षा आणि टॅक्सी यूनियनकडून व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी भाडेवाढ होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. आता प्रशासन भाडेवाढीसंदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :
तुमच्या मुलांसाठी अर्ज करताय ना?; RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना