कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारी महिला जीम ट्रेनरसोबत छेडछाड आणि मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. छेड काढणाऱ्या व्यक्तीला त्या महिलेनं पकडलं आणि मदतीची याचना केली.


रेल्वे स्थानकावर गर्दी असून सर्वच पाहत राहिले मात्र मदतीसाठी कोणीही पुढं आलं नाही. अखेर पीडित महिलेनं आरपीएफ कार्यालयात धाव घेतली. तिथे असलेले पोलीस सीसीटीव्ही पाहण्यात धन्यता मानत होते.

आरपीएफच्या जवानांनी तुमच्यासोबतच हा प्रकार घडला का? असा संतापजनक सवाल पीडितेला विचारला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात छेडछाड आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, महिलेशी छेडछाड करुन मारहाण करणाऱ्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.