मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना विशेष टाडा कोर्ट 7 सप्टेंबरला शिक्षा सुनावणार आहे. यात कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला नेमकी काय शिक्षा सुनावली जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

पोर्तुगालशी भारताने केलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यामुळे सालेमला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली आहे. तर ताहिर मर्चंट, फिरोज खान, करीमुल्ला खान यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. तसंच रियाज सिद्दीकाला जन्मठेपेची मागणी केली आहे.

यातील एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.

या खटल्यातील आरोपी दोषी आहेत किंवा नाहीत याचा निकाल कोर्टाने 16 जून रोजी दिला होता.

संबंधित बातम्या

1993 बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरच शिक्षा सुनावणार


मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू


1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत आजपासून युक्तीवाद


1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद


12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?


मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष


संबंधित फोटो फीचर


1993 मुंबई साखळी स्फोट : कोणावर काय आरोप?