Mumbai: मुंबई पोलीस (Mumbai Police) पथकातील आठ पोलिसांचं नुकतंच निलंबन करण्यात आलं आहे. ताडदेव स्थानिक शस्त्रास्त्र विभागाशी संलग्न असलेल्या आठ पोलिसांना अनुशासनहीन काम केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. संबंधिक पोलिसांनी कारकूनच्या मदतीने त्यांनी खोटी हजेरी आणि खोट्या रजेच्या नोंदी केल्या असल्याचं तपासातून उघड झालं आहे. निलंबन करण्यात आलेल्यांपैकी काही पोलीस आपापल्या गावी गेले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


स्थानिक शस्त्रास्त्र विभागाशी संलग्न चार हवालदार नेमून दिलेली कामं आणि कर्तव्यं करत नसल्याचा आरोप आहे आणि दोन पोलीस कारकूनच्या मदतीने स्वतःला कामावर उपस्थित असल्याचं चिन्हांकित करत होते आणि हजेरीच्या खोट्या नोंदी नोंदवत होते. कारकुनी काम करणाऱ्या इतर दोन पोलिसांवरही प्रलंबित प्रकरणांना हेतूपरस्पर विलंब केल्याबद्दल कारवाईला सामोरं जावं लागलं.


यंदाच्या वर्षी 1 मे ते 21 जून या कालावधीत पोलीस नाईक संदीप पाटील, हवालदार अतुल वानखेडे, भरत हिंगणे आणि सचिन पाटील या चार हवालदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटीसाठी नेमण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं, मात्र त्यांनी ती ड्युटी केली नाही.नेमून दिलेल्या ड्युटीवर ते हजर राहत नव्हते.  


पोलीस विभागातील सूत्रांनी सांगितलं की, कॉन्स्टेबल हृषिकेश दराडे हे एल-कंपनीमध्ये कारकून पदावर होते आणि कॉन्स्टेबल रमेश दिंडे हे दराडे यांचे सहाय्यक होते. कॉन्स्टेबलची हजेरी, पानं आणि इतर तपशीलांची नोंद ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. नुकत्याच तक्रारी आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघांनी ठेवलेल्या रजिस्टरची तपासणी केली.


त्याचप्रमाणे ताडदेव स्थानिक शस्त्र विभागाशी संलग्न हवालदार नीलेश खंदारे आणि नितीन शिंदे या दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर कंपनी कारकून आणि असिस्टंट कंपनी कारकूनची जबाबदारी सोपावण्यात आली होती. इतर चार कारकून आणि कारकुनी कामगार आहेत ज्यांनी मुख्य चार आरोपी पोलिसांना अनुशासनहीन कामात मदत केली.


नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं


गेल्या काही दिवसांत दामदुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक शहरातील अनेक नागरिकांची देखील अशा माध्यमातून फसवणूक झाली आहे. अशातच एकाच दिवसात नाशिकमधील नऊ जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.


हेही वाचा:


Nitin Gadkari Threat Calls : नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणातला खरा मास्टरमाईंड समोर, PFI, लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या पाशा अफसरचा हात