मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता अनेक चेहरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरु केल्यानंतर इथे राजकारणालाही उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील संदीप सिंह याचे फोटो राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबत असल्याने ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचाच आधार घेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. संदीप सिंहला भाजप इतकं महत्त्व का देत आहे? संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात 53 वेळा कॉल केल्याचं उघड झालं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक तयार करण्याचे काम हे भाजपने संदीप सिंहला का दिलं?, 177 कोटी रुपयांचा MOU गुजरात सरकारने संदीप सिंहच्या कंपनीसोबत केला होता. याचे उत्तर आता भाजपने देणं गरजेचं असल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.


सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, काँग्रेसची मागणी


सचिन सावंत यांनी संदीप सिंह याला समोर ठेवून भाजपावर जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आणि बाळबोध पद्धतीने केले आहेत, असा टोला भाजपचे आमदार राम कदम यांनी लगावला आहे. तुम्हाला संदीप सिंहची चौकशी करायची होती तर तुमच्याकडे 65 दिवसांचा कालावधी होता. त्यावेळी का केला नाही, असा सवालही आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. रिया आणि महाराष्ट्र सरकारचं नातं काय आहे? रियाचे प्रवक्ते असल्यासारखं महाराष्ट्रातील नेते बोलत आहेत. या 65 दिवसात हे सरकार नेमकं कुणाला वाचवत आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप हे बाळबोध असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले आहे.


एका बाजूला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासात गती घेतलेली आहे. तर दुसरीकडे या संदर्भातले राजकारण देखील तापू लागले आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आता सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.


संबंधित बातम्या


SSR Case | रिया-संदीप फिरतायत नावाजलेल्या गीतकाराच्या गाडीतून?

SSR Suicide Case | संदीप सिंग तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता?

SSR Case | सुशांतचं पार्थिव नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला संदीप सिंहचे चार फोन

SSR Suicide Case | सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी निर्माता संदीप सिंह विरोधात तक्रार दाखल