मुंबई : तुम्हाला तुमच्या बायकोचा मोबाईल नंबर पाठ आहे का? हा प्रश्न विचारला जाण्यामागे एक कारण आहे. कारण मुंबईतील दहापैकी नऊ पुरुषांना त्यांच्या बायकोचा मोबाईल नंबर पाठ नाही असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्यामुळे तो लक्षात ठेवायची गरज नाही असं या पुरुषांचं मत आहे. 


आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये साठवलेल्या माहितीमुळे एका क्षणात हवी ती सर्व माहिती समोर येते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली जात आहे. परिणामी शहरातील दहा जणांपैकी नऊ जणांना त्यांच्या बायकोचा मोबाईल नंबर पाठ नाही, लक्षात नाही किंवा माहित नाही असं समोर आलं आहे. 


सुरुवातीच्या काळात मोजक्याच लोकांकडे मोबाईल असायचे. त्यामुळे नंबर सहज पाठ होत असत. आता मात्र एका मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या मोबाईल नंबरशिवाय इतरांचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्नही केला जात नाही. ज्यांच्याकडे अद्याप मोबाईल नाही अशा लहानग्यांना मात्र आई-वडिलांचे नंबर पाठ आहेत


या बाबतीत तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच झाले आहेत. मोबाईलने लिंग, धर्म, सामाजिक स्तर असा भेदाभेदच मिटवलाय. आता सर्वांकडेच स्मार्ट फोन असल्याने जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहत आहेत. फोनमध्ये नंबर सेव्ह केला जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कुणी लक्षच देत नाही. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच आपला मोबाईल नंबर सोडून इतरांचा नंबर लक्षात राहत नाही. कांही जणांना स्वत:चा सोडून इतर फक्त आपल्या बॉसचा नंबर लक्षात आहे


या सर्व्हेक्षणातून काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यामध्ये बायकोचा नंबर लक्षात नाही, नंबर सेव्ह आहे, कधी-कधी बायकोचे नंबर सेव्ह असून सुद्धा फोन उचलत नाही, तर बायकोच नाही तर फोन नंबर कसा लक्षात राहणार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पुरुष मंडळींनी दिल्या आहेत.


त्यामुळे ज्यांची लग्न झाली आहेत आणि ज्यांना त्यांच्या बायकोचा नंबर पाठ नाही तर त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापलिकडे आपण काहीही करु शकत नाही. पण ज्यांची लग्न अजून व्हायची आहेत त्यानी आताच सावध होऊन होणाऱ्या बायकोचा नंबर पाठ करायला लागावं. 


पहा व्हिडीओ : तुमच्या पत्नीचा मोबाईल नंबर पाठ आहे? 10 पैकी 9 पुरुषांना पत्नीचा फोन नंबर पाठ नाही, सर्वेक्षणात माहिती समोर


 



महत्वाच्या बातम्या :