Corona Cases Today : देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41,506 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 895 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी देशात 42,766 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत देशात 41,526 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 



राज्यात काल (शनिवारी) 8296  नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 6026  रुग्ण कोरोनामुक्त


राज्यात काल 8 हजार 296  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 26  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 06 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के आहे. 


राज्यात गेल्या 24 तासांत 179 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चार जिल्ह्यामध्ये कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आली आहे. यामध्ये यवतमाळ (20 ), हिंगोली ( 80 ), गोंदिया ( 81 ) नंदूरबार (97 ) या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. 


दोन जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या शून्यावर


काल (शनिवारी) नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळेलेला नाही. तर गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. काल सर्वाधिक 1146 कोरोना बाधित रुग्ण कोल्हापुरात आढळले आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासांत 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासांत 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 736 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,01,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,484 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 909  दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :