मुंबई : मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनचं आज दुपारी चार वाजता उद्घाटन होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नव्या स्थानकाचं उद्धाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उद्योगमंत्री सुभाष देसाईंसह अन्य नेतेही उपस्थित राहाणार आहेत.
राम मंदिर या स्थानकाच्या नावावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. आधी ओशिवरा असं या स्थानकाचं नाव असेल अशी माहिती मिळाली. मात्र काही दिवसांपूर्वी या स्थानकाचं नाव राम मंदिर ठेवून त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही सरकारकडून निश्चित करण्यात आला.
या रेल्वे स्थानकाचं कामच पूर्ण न झाल्यानं उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. शेवटी आज रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हे रेल्वे स्थानक सुरु होणार आहे.