शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, सुधीर मुनगंटीवारच गोड बातमी देतील : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2019 08:38 PM (IST)
उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.
मुंबई : युतीतली कोंडी काही सुटायचं नाव घेत नाही आहे. त्याचंपार्श्वभूमीवर भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपने भूमिका स्पष्ट करुन तासही लोटत नाही तोच शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 145 चं संख्याबळ असेल तर भाजपने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करावा असं राऊत यांनी भाजपला चिमटा काढली आहे. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याची गोड बातमी मुनगंटीवारच देतील अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवारांना टोला हाणला आहे. तसेच भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले. दरम्यान उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील सत्तासमीकरणं, शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. तसेचं आगामी काळात पक्षाने काय भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा होऊ शकते. त्यामुळे उद्याच्या शिवसेच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. Sudhir Mungantiwar PC | गोड बातमी कधीही येऊ शकते : सुधीर मुनगंटीवार | मुंबई | ABP Majha संबंधित बातम्या