- मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समसमान वाटप. यात पहिले अडीच वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल.
- महत्वाच्या खात्यात समान वाटा हवा आहे. गृह, महसूल, अर्थ, ऊर्जा, बांधकाम, नगरविकास, या महत्वाच्या खात्यातील ३ मंत्रीपदे हवीत.
- तर एकूण 42 मंत्रीपदांपैकी 21-21 असे समसमान वाटप व्हावे.
- महामंडळांच्या समसमान वाटपासाठी सेना आग्रही आहे. शंभरहून अधिक महामंडळे आहेत. यात जी महत्वाची महामंडळे आहेत, त्यावरही सेनेना दावा केला आहे. भाजपने हा प्रस्ताव मान्य केला नाही तर सेना प्लॅन बी राबवणार आहे.
सत्तास्थापनेसाठी सेनेचे भाजपसमोर 4 प्रस्ताव; मुख्यमंत्रीपदावर ठाम
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2019 12:25 PM (IST)
भाजपकडून चर्चेसाठी दारे अखेर खुली करण्यात आली आहे. मात्र, भाजपनेही मुख्यमंत्री आमचाच असेल आणि तो 5 वर्ष राहिल, असे म्हटले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. दरम्यान, आता शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर 4 प्रस्ताव ठेवले आहेत.
मुंबई - शिवसेनेकडून एकतर्फी सुरु असलेल्या दबावतंत्रानंतर अखेर भाजपच्या गोटातून काल(5 नोव्हेंबहर)चर्चेसाठी दारे खुली करण्यात आली आहे. मात्र, मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री आमचाच होईल आणि तो ५ वर्षांसाठी असेल, असे म्हटल्याने गुंता आणखी वाढला आहे. त्यात आता शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर 4 प्रस्ताव ठेवले आहेत. यात मुख्यमंत्रीपदासोबतच सत्तेत समान वाटा मागितला आहे. गेल्या १४ दिवसांपासून भापजने घेतलेली चुप्पी अखेर सोडली आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन लवकरात लवकर सरकार स्थापन करु, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपची कोअर कमिटीची बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. मात्र, सेना अजूनही मुख्यमंत्री पदावर ठाम असून त्यांनी भाजपसमोर 4 प्रस्ताव ठेवले आहेत. शिवसेनेचे 4 प्रस्ताव -