मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेला गुन्हा हा कोणत्याही सूडबुद्धीतून केलेला नाही. त्यांनी राज्याच्या गृहमंत्रालयावर आणि अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले म्हणून हा गुन्हा केली नाही. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य वाटलं म्हणूनच ही कारवाई केली असा खुलासा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.


परमबीर सिंह यांच्याविरोधात भीमराव घाडगे यांनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दिली होती. साल 2015 मधील हे प्रकरण आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर घाडगे यांनी स्वतःची बाजूही प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टापुढे मांडली आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेले आरोप मागे घ्यावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणावा या हेतूनं ही तक्रार आत्ता केलेली नाही, असं घाडगे यांनी म्हटलं आहे. या तक्रारींचा त्यांच्या आरोपांशी संबंध नाही, ही कारणं आधारहिन आहेत, असा दावा यात करण्यात आलेला आहे. तसेच राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या सांगण्यावरून ही तक्रार केली नाही, असंही यामध्ये म्हटलेलं आहे.


साल 2015 ते 2018 मध्ये घडलेल्या काही प्रकरणांचा तपास करताना ठराविक लोकांना आरोपी न करण्यास परमबीर सिंह यांनी घाडगे यांना सांगितलम होतं. मात्र हे घाडगे यांनी हे मान्य केलं नाही. त्यामुळे त्यांना परमबीर सिंह यांनी आपल्याला मानहानिकारक वागणूक दिली, त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले, आणि जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केला असे आरोप या तक्रारीत केले आहेत. 


संबंधित बातम्या