मुंबई : शहरातील अत्यंत गर्दी होणारे रेल्वेस्थानक म्हणून ओळख असलेल्या वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत.


नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.


पावणे तीन वाजता घडली घटना 


एबीपी माझ्याच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे गोरखपूरला जाते. सध्या दिवाळी आणि छटपूजा आहे. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी जमले होते. मात्र चेंगराचेंगरी झाल्याने एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रक्रिया स्थिर आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


जखमी झालेल्या प्रवाशांची नावे :



शबीर अब्दुल रेहमान
परमेश्वर गुप्ता
रविंद्र छुमा
रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती
संजय कांगाय
दिव्यांशू यादव
मोहम्मद शेख
इंद्रजित शहानी
नूर शेख


पाहा व्हिडीओ :



रेल्वे, पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण नाही


 मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेविषयी रेल्वे प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने अद्याप कोणताही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गोरखपूरकडे जाणारी ही रेल्वे अनारक्षित होती. म्हणजेच या रेल्वेतून प्रवास करताना आरक्षणाची गरज नव्हती. म्हणूनच या रेल्वेत चढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वेत चढण्याच्या याच प्रयत्नातून चेंगराचेंगरीची ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवाशांचा हात तुटला आहे, तर एका प्रवाशाच्या मांडीला गंभीर जखम झाल्याचेही दिसत आहे. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा या भागात रेल्वे पोलीस नव्हते अशी माहिती मिळत आहे.       


हेही वाचा :


मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात


ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?


मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार