ST Workers Strike Updates :  मागील 16 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची तीव्रता वाढू लागली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवास स्थानाबाहेर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी काळं फेकण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी चार ते पाच आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.  


मागील काही दिवसांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आझाद मैदानाबाहेर पडण्यास पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता. 


आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ डांबर सदृष्य काळं फेकले.  पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 


शरद पवार आणि अनिल परब यांच्यात चर्चा


मागील 15 दिवसापासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत एसटी महामंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. एसटीच्या संपामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या बैठकीत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये कसं ट्रान्सपोर्ट चालतं त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार: केंद्रीय मंत्री नारायण राणे


एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण अशक्य?; फडणवीसांचे सूचक वक्तव्य


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha