Aryan Khan case  मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबीवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.


मुंबई हायकोर्टाने आर्यन खान आणि इतर काही आरोपींना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर केला होता.   आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसेच या प्रकरणात एनसीबीकडून ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेण्यात आलं होते त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नसल्याचं 28 ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटले होते. 


क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत भाजपशी संबंधित लोक असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणातील एक पंच किरण गोसावी याच्यावरही गु्न्हे दाखल असून तो फरार असल्याचे समोर आले होते. नवाब मलिक यांच्याकडून आरोप सुरू असताना दुसरीकडे  या प्रकरणाशी निगडित असलेल्या काही जणांकडूनही गौप्यस्फोट करण्यात येत होते. आर्यन खानवर झालेली कारवाई ही खंडणीसाठी झाल्याचाही आरोप होऊ लागला होता. 



हायकोर्टाने जामीन निकालपत्रात काय म्हटले?


आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, तर आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. ड्रग्ज अरबाज खान आणि मुनमुनकडे सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी 28 ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयानं केलीय. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Aryan Khan case : आर्यन खान प्रकरण घडवून आणलं; साक्षीदार विजय पगारेंचा दावा


ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा नाहीच, नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखण्यास कोर्टाचा नकार