मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसांत प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावावी लागणार आहे. दीपिका पादुकोण मुंबईत नाही, त्यामुळे ती 25 सप्टेंबरला एनसीबीसमोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.


यापूर्वी मंगळवारी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि KWAN टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांनाही समन्स बजावले होते, परंतु करिश्माची तब्येत ठिक नसल्यामुळे एजन्सीसमोर हजर होऊ शकली नाही.


जया सहाची एनसीबीकडून चौकशी; अभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची कबुली


एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले होते की, गरज भासल्यास दीपिकाला चौकशीसाठी बोलवलं जावू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित अमली पदार्थांविषयी व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट एजन्सीच्या तपासांतर्गत आहेत.


काय आहे चॅट?


D' to K: तुमच्याकडे माल आहे का?
K' reply: हो, पण घरी आहे, मी बांद्रामध्ये आहे.
K writes: जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते.
D writes: हो. प्लीज
K writes: अमित जवळ आहे, तो ठेवतो.
D writes: Hash ना?
D writes: गांजा नाही
K writes: कोको जवळ तू कधी येणार आहेस?
D writes: साडेअकरा ते 12 दरम्यान.


आजही चौकशी सुरु


ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत. सुशांतसिंग राजपूतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहा, अबीगल पांडे आणि सनम जोहर यांची आज एनसीबी टीमकडून चौकशी झाली. जया साहाची सलग तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे.


संबंधित बातम्या